इलेक्ट्रोनिक्स व प्रिंट्स मेदियातील सर्व पत्रकार बांधवासाठी मार्गदर्शन कार्यशाळा

१५ सप्टेंबर रोजी विज्ञान महाविद्यालय येथे आय. सी. आय. सी. आय. बँकेच्या कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन

सांगोला/ प्रतिनिधी - १५ सप्टेंबर रोजी विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे विज्ञान महाविद्यालय सांगोला व आय.सी.आय.सी.आय. बँक यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्पस रिक्रुटमेंट ड्राईव्हचे आयोजन केले आहे. सदर रिक्रुटमेंट ड्राईव्हसाठी पदवी पूर्ण केलेले विद्यार्थी किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षाला बसलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. सदर ड्राईव्हला उपस्थित राहताना सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे व झेरॉक्सचा एक संच सोबत आणावा.सदर ड्राईव्ह १५ सप्टेंबर रोजी सकाळी ठीक १० वाजता सुरु होणार आहे. सकाळी १० ते ११ या वेळेत विद्यार्थ्यांची नाव नोंदणी केली जाईल. ११ ते १२ या वेळेत विद्यार्थ्यांना बॅंकेची ओळख व कामाचे स्वरूप व इतर सर्व माहिती बँक.

१२ ते १ या वेळेत ऑनलाईन व लेखी परीक्षा घेतली जाईल. १ ते २ या वेळेत जेवणासाठी सुट्टी राहील. २ ते ४ या वेळेत लेखी परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची बँकेचे अधिकारी मुलाखत घेणार आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनची यादी वेळ असेल तर त्याच दिवशी अन्यथा दुसऱ्या दिवशी जाहीर केली जाईल. सदर कॅम्पस ड्राईव्हसाठी आय. सी. आय. सी. आय. बँकेचे सिनियर एक्जक्युटीव्ह विवेक अजमाने, व संग्राम देशमुख व त्यांचे इतर सर्व सहकारी उपस्थित राहणार आहेत. सदर कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रघुनाथ फुले यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे तरी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ट्रेनींग व प्लेसमेंट कमिटीचे चेअरमन प्रा. शेख एन. एस यांनी केले आहे अशी माहिती प्रसिद्धी कमिटीचे चेअरमन प्रा. बाळासाहेब सरगर यांनी दिली आहे.


प्रा.मनोहर वाघमोडे यांना भूगोल या विषयात पी.एच.डी ही पदवी मिळाल्याबद्दल

विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक व आमचे सहकारी प्रा.मनोहर वाघमोडे यांना भूगोल या विषयात पी.एच.डी ही पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार संगणकशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आला.


Functions


Hydroponics Project


Click to Download HYDROPONICS PROJECT Document

Shikshak palak melava 2018-19.विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न


१४ मार्च रोजी विज्ञान महाविद्यालय सांगोला मधील डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर सायन्स मधील बी.एस्सी (ई.सी.एस) भाग-३ व बी.सी.ए भाग-३ च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम संगणकशास्त्र विभागातील बी.एस्सी.(ई.सी.एस) भाग-१ व २ आणि बी.सी.ए भाग-१ व २ मधील विद्यार्थ्यांनी आयोजित केला होता. सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाव्हुण्यांचा व अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचा आणि बी.एस्सी.(ई.सी.एस) भाग-३ व बी.सी.ए भाग-३ मधील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर बी.एस्सी (ई.सी.एस) भाग-३ व बी.सी.ए भाग-३ मधील विद्यार्थी प्रतिनिधी समाधान खांडेकर, सुशांत भगत , रुपाली गाडे, अश्विनी शिंदे , अमर चंदनशिवे, प्रकाश खांडेकर, चंद्रकांत चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

त्यानंतर प्रमुख पाहुणे न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू कॉलेज सांगोला मधील इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचे हेड प्रा. इंगळे सी. एन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना आपले स्किल डेव्हलपमेंट करण्याचे आव्हान केले. तसेच माणसाचे आयुष्य हे हिरव्या चाफ्यासारखे असावे व माणसाने निरीक्षणाला महत्त्व द्यावे यासाठी त्यांनी काही उदाहरणे दिली. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष संगणकशास्त्र विभागातील प्रा. साळुंखे यू. बी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी विदयार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासावर लक्ष देण्याचे आव्हान केले. त्यानंतर प्रा. भानवसे डी. पी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी असे सांगितले कि जरी विदयार्थ्यांना निरोप दिला असला तरी सुद्धा विद्यार्थ्यांनी आपली महाविद्यालयाशी आपली नाळ कायम ठेवावी. त्यानंतर आभार प्रदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन बी.एस्सी (ई.सी.एस) भाग-२ मधील कु. काजल काशीद हिने केले.

सदर कार्यक्रम संगणकशास्त्र विभागप्रमुख मा.प्रा. कोळवले एच.डी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. गाडेकर एस.टी ,प्रा.सौ. कसबे एस. व्ही, प्रा.शेख जे.यू, प्रा. रसाळ एन.एस, प्रा.सौ. धुरे एम.डी, प्रा. लवटे पी.एम., प्रा. कोळवले डी.एस., प्रा. शेख एन.एस, प्रा. दिवटे एस.एस., प्रा. सौ. पाटील एल.आर, प्रा. कु. मेटकरी एम. एस., प्रा. माणगावे डी.आर, प्रा. उपाध्ये बाहुबली, श्री. कारंडे एस.एम., श्री. कादरी एम.जे, श्री समाधान गव्हाणे, श्री निसार मुलाणी यांनी विशेष परिश्रम घेतले. अशी माहिती प्रसिद्धी कमिटीचे चेअरमन प्रा. बाळासाहेब सरगर यांनी दिली आहे.

विज्ञान महाविद्यालय सांगोला येथील प्राणीशास्त्र विभागाचे विभागप्रमूख मा.प्रा.श्री लगळी टी.एस हे 30/09/2017 रोजी सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त 03/10/2017 रोजी महाविद्यालयामध्ये त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता.

13/10/2017 रोजी विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.

VIDNYAN MAHAVIDYALAYA SANGOLA. DEPARTMENT OF BOTANY One day state level workshop on “Vegetable Carving” Organized on 20 th December 2016 Programme Report


The Department of Botany of Vidnyan Mahavidyalaya, Sangola has successfully organized One day State level workshop on “ Vegetable Carving” for B.Sc. III,Botany students dated on 20 th December 2016. After registration, breakfast & tea,the inaugural function of workshop was started at 10.30 a.m. About 60 student participants from various colleges were registered for the workshop. The chief guest was Dr. P.B Guvhane and Hon. Vitthalrao Shinde, the Secretary of Sangola Taluka Shetkari Shikshan Prasarak Mandal was President of the function. The workshop was conducted in three technical sessions.

In the first technical session, Asso. Prof. Seema Gaikwad, Dept.of Botany, Vidnyan Mahavidyalaya, Sangola delivered a lecture on vegetable carving through power point presentation which was very informative. The second technical session was conducted by Mrs. Lata Kambale. In this session,demonstration of vegetable carving was given by resource person. The third technical session was about the practical session in which participants actually done the carving of fruits and vegetables. The valedictory function and certificate distribution was conducted after the technical sessions.

VIDNYAN MAHAVIDYALAYA SANGOLA DEPARTMENT OF computer Science " Awareness of Office Automation and Digital Communication for Non-Teaching Staff "


Vidnyan Mahavidylaya, Sangola has organized, one day workshop on “Awareness of Office Automation and Digital Communication for Non-Teaching Staff on 16 December 2017.The resource person for this workshop were Mr. N.S. Rasal, V.M. Sangola, Mr. D. S. Kolawale, V.M.Sangola, Mr.M.J.Kadri V. M. Sangola The theme of Workshop is to focus on Awareness of Digital Technology Usages for simplifying day to day office work. In this seminar, covered the points on the usage of application like Microsoft word, Excel, OneNote, power point, accounting application like Tally for Solving daily office work problems.

25 delegates from Pandharpur, Mangalwedha, Mohol, Barshi, Solapur ,Sangola, Junoni, Kamlapur, Akluj. In the field of Academic and Non- Teaching Staff were participated in this workshop. The participation certificates are distributed to every participant.